पुण्याच्या ऐतिहासिक संस्कृतीचा अभेद्य मानबिंदू व गौरवशाली शतकाची वाटचाल
स्वातंत्र्यपूर्व काळात १९४२ मध्ये कै. लक्ष्मीशेठ अग्रवाल व सहकाऱ्यांनी येवले चाळीत मुहूर्तमेढ रोवली. जागा अपुरी पडू लागल्याने बाजीराव रोड नातूबाग येथे मंडळ स्थलांतरित झाले. सुरुवातीला भजन, कीर्तन, लोकनृत्य व पडद्यावरील चित्रपटांद्वारे प्रबोधन केले जाई.
कै. लक्ष्मीशेठ अग्रवाल, कै. विष्णुपंत कंवर आणि विश्वनाथ साष्टे यांनी मंडळाचा भक्कम पाया रचला.
कै. रघुनाथ साष्टे यांनी १९८५ पासून सलग २८ वर्षे अध्यक्षपद भूषवत मंडळाच्या वाटचालीत मोलाचे योगदान दिले.
श्री. शिरीष कोरडे आणि श्री. प्रमोद कोंढरे यांनी मंडळाची धुरा समर्थपणे सांभाळली. श्री. प्रमोद कोंढरे यांनी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून मंडळाचा जुना लक्ष्मी रोड विसर्जन पास पुन्हा कार्यान्वित केला.
महाराष्ट्रात सर्वप्रथम एलईडी (LED) व पिक्सेल बल्बचा प्रभावी वापर नातूबाग मंडळाने केला. 'शिवशक्ती इलेक्ट्रिकल्स'च्या श्री. दारफळे (शंकर दारफळे) यांच्या कलाकुसरीने ही रोषणाई साकारली गेली.
सिग्नेचर गाणी: 'ओठों पे ऐसी बात' (ज्वेल थीफ), 'पग घुंगरू' आणि तरुणाईच्या पसंतीची 'रेल गाडी' या गाण्यांवर थिरकणारी प्रकाशधारा सबंध महाराष्ट्रातील गणेशभक्तांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे.
९० च्या दशकात धर्मवीर आनंद दिघे साहेबांना नातूबागचा विसर्जन रथ भावला; त्यानंतर अनेक वर्षे नातूबागचे कलात्मक रथ ठाण्याच्या टेंभी नाका नवरात्रोत्सवाच्या मिरवणुकीत सहभागी होत राहिले, ज्यामुळे पुणे आणि ठाणे या दोन शहरांच्या उत्सवांना जोडणारा जिव्हाळ्याचा दुवा निर्माण झाला.
गाजलेले ऐतिहासिक रथ: २००३ चा कासव रथ, शनिवारवाडा रथ, गंडभेरूंड रथ, शिवस्मारक रथ, युरोपियन रथ, श्रीराम भक्त हनुमान रथ, वराह अवतार रथ आणि नृसिंह अवतार रथ यांसारख्या भव्य कलाकृतींनी पुणेकरांचे लक्ष वेधून घेतले.
सन २००८ मध्ये बाप्पासाठी साकारण्यात आलेला १२१ तोळ्यांचा सुवर्णहार — दीपक मानकर, पी. एन. जी. चे सौरभ गाडगीळ, समाजातील मान्यवर आणि कार्यकर्त्यांच्या एकजुटीचे व अखंड भक्तीचे अजरामर प्रतीक ठरला.
Loading Memories...
Loading News Highlights...